
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : NEET-UG 2024 मधील पेपर फुटी आणि सीबीआय चौकशीची मागणी करणार्यां याचिकांवर आज दि. १४ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली आहे. तसेच या याचिकांवरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी या प्रकरणी दाखल अन्य याचिकांबराेबर होईल, असेही स्पष्ट केले आहे.
Supreme Court issues notice to National Testing Agency (NTA) on a batch of petitions raising concerns of paper leak and CBI probe into the NEET-UG 2024.
Supreme Court tags and posts the pleas for hearing along with similar petitions on July 8. pic.twitter.com/tzAPE0U5VW
— ANI (@ANI) June 14, 2024
NEET-UG ग्रेस गुण रद्द : NTA ची माहिती, 1,563 उमेदवारांची हाेणार पुनर्परीक्षा
NEET-UG 2024मध्ये ग्रेस गुण देण्यात आलेल्या 1,563 पेक्षा अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. हे गुण परीक्षेदरम्यान वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या उद्देशाने दिले हाेते. आता या 1,563 उमेदवारांचे गुणपत्रक रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज ( दि. १३) सर्वोच्च न्यायालयात दिली. दरम्यान, वैद्यकीय प्रवेशसाठीचे NEET-UG समुपदेशनाला स्थगिती देण्यात येणार नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. १३) झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले हाेते.
नीट परीक्षेत पेपरफुटी व निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वप्रथम ११ जूनला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली हाेती. परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली हाेती. तसेच पुढील सुनावणी ८ जुलै राेजी हाेईल. ताेपर्यंत ‘एनटीए’ने उत्तर दाखल करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले हाेते.
