केतकी चितळेचा रडत रडत व्हिडिओ व्हायरल; महायुतीवर हल्लाबोल..

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. केतकी या व्हिडिओमध्ये रडत रडत शिंदे सरकारवर टीका करताना दिसतेय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय पाहा… अधिक वाचा- हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, …

केतकी चितळेचा रडत रडत व्हिडिओ व्हायरल; महायुतीवर हल्लाबोल..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. केतकी या व्हिडिओमध्ये रडत रडत शिंदे सरकारवर टीका करताना दिसतेय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय पाहा…
अधिक वाचा-

हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या..’

केतकीने ‘तीन चाकी सायकलनी बहुतेक प्रचंड मनावर घेतले आहे की आपण कसे पडून दाखवायचे ते’, असे शीर्षक व्हिडिओला देत सोशल मीडियावर तिने पोस्ट केलं आहे. ती म्हणते, ”एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे. त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना १० कोटी रूपये दिले आहेत. तुम्ही बधीर आहात, की आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासून म्हणत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे.”
अधिक वाचा-

ज्याने सोनू सूदचं पहिलं फोटोशूट केलं; तो ‘फतेह’मध्ये दिसणार

राज्यातील ​’वक्फ’ मंडळाचे बळकटीकरण करण्यासाठी सरकारने १० कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. त्यापैकी २ कोटी रुपये १० जूनला वितरीत केल्याचे शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे.
अधिक वाचा- 

तापसी पन्नूची छोटी बहिण तिच्यापेक्षाही हॉट, फोटो पाहाच!

View this post on Instagram

 
A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)