नंदुरबार : धक्कादायक! महिलेचे शीर आढळले; परिसरात खळबळ
नंदुरबार, Bharat Live News Media वृत्तसेवा : विसरवाडी येथील तरुणाच्या खुनाची घटना दोन दिवसांपुर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोरडी धरणात प्रकल्पाजवळ एका महिलेचे मुंडके छाटून फेकलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही महिला कोण? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याबरोबरच या दोन्ही हत्यांमागे एकच सूत्रधारा आहे काय? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ पाइपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह मंगळवारी (दि.11)आढळला होता. सकाळी काही कुत्रे मृतदेहाचे लचके तोडताना परिसरातील शेतकऱ्यांना दिसले होते. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पाकिटामुळे कागदपत्रांमुळे मृताची ओळख पटली असून राकेश रमेश समाल (वय.29 रा. विष्णुनगर, उधना) असे मृताचे नाव उघड झाले आहे.
तरुणाचा निर्घण खून करणाऱ्या मारेकऱ्यांचा विसरवाडी पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान बुधवारी (दि.12) खांडबारा परिसरातील कोरडी प्रकल्पाच्या पाण्यात एका महिलेचे फेकलेले शीर आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणामध्ये शेतकरी जनावरे धुण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना पाण्यावर तरंगणारी प्लास्टिकची पिशवीमध्ये महिलेचे कापलेले शीर आढळून आले. गावच्या पोलीस पाटीलांच्या माध्यमातून विसरवाडी पोलीस ठाण्याला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. परंतु, शोधामध्ये शव आढळून आले नाही. त्यामुळे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
महागाई दरात घट तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ
कोल्हापूर: शिरोली मिनी औद्योगिक वसाहतीतील रस्ता बनला डर्क ट्रॅक
ठाणे: डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू