डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत पुन्हा आग

ठाणे : पुढारी वृत्तसेवा डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या केमिकल कंपन्यांमध्ये सुरू असलेले आगीचे व स्फोटांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. येथील अमुदान या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच आज (बुधवार) सकाळी याच परिसरात पुन्हा एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील …

डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत पुन्हा आग

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या केमिकल कंपन्यांमध्ये सुरू असलेले आगीचे व स्फोटांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. येथील अमुदान या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच आज (बुधवार) सकाळी याच परिसरात पुन्हा एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली.
डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ज्या अमुदान कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली होती. त्याच फेज 2 मधील इंडो अमाईन या केमिकल कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना समोर आली. कंपनीत लागलेल्या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत होते. त्यामुळे सकाळीच पुन्हा डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान हजर झाले असून, आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनांकडून देण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली व त्यात किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा : 

सीमा, चार मुलं परत कर, पाकिस्‍तानने परराष्‍ट्र मंत्रालयाला पाठवले पत्र

…तर लोकसभेपेक्षा दहापट जास्त फटका विधानसभेला बसेल; जरांगेंचा सरकारला इशारा

Stock Market : ‘निफ्टी’ नव्या विक्रमी पातळीवर, प्रथमच गाठला २३,४१७ चा टप्‍पा