मातोश्रीवर खासदार बळवंत वानखडे-उद्धव ठाकरे यांची भेट
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (दि.११) भेट घेतली.
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला
नवनीत राणा यांचा पराभव करण्याचा शिवसेनेचा निर्धार
बळवंत वानखडे यांच्याकडून भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव
विजयी झाल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांची मातोश्री निवासस्थानी भेट
मातोश्री निवासस्थानी भेट
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे लोकसभा निवडणुकीत निश्चितच विजयी होतील आणि ते विजयी झाल्यानंतर मातोश्री निवासस्थानी भेट देतील, असा विश्वास प्रचारादरम्यान व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीने अमरावतीत मिळवलेल्या या विजयानंतर आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी भेट घेतली. दरम्यान त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेतली. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते.
भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव
अमरावती लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा या हनुमान चालीसा प्रकरण आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेतून निवडून जाऊ द्यायचे नाही, असा निर्धार अमरावतीतील ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सभा अमरावतीत बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आल्या होत्या. त्या सभांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. अमरावतीत महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार वानखडे यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न फळाला आले आणि ते विजयी झाले. त्यामुळे वानखडे यांनी विजयी झाल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा
युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त
लवकरच उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये सामील होतील ‘या’ नेत्याचे मोठे विधान
Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रात ‘मविआ’ला ४८ पैकी ४८ जागा मिळतील; उद्धव ठाकरे यांचा दावा