कोगील बुद्रूकमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत बालिका जागीच ठार

कोगील बुद्रूकमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत बालिका जागीच ठार

उजळाईवाडी, Bharat Live News Media वृत्तसेवा : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने कोगील बुद्रूक (ता. करवीर) येथील श्रावणी विशाल गणेशाचार्य या सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत ट्रॅक्टर चालक योगेश मधुकर मगदूम (वय 20, रा. दर्‍याचे वडगाव, ता. करवीर) याच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
योगेश मगदूम ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन जात होता. यावेळी भरधाव ट्रॅक्टरने जयपाल गणेशाचार्य यांच्या घरासमोर श्रावणीला जोराची धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. बालिकेच्या मृत्यूमुळे कोगील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची फिर्याद विशाल बाजीराव गणेशाचार्य यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.