मान्सून कुठवर पोहोचला हे हवामान खात्याला कसे कळते?

मान्सून कुठवर पोहोचला हे हवामान खात्याला कसे कळते?

पॅरिस : हवामान खात्याचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. या अंदाजानुसारच, रेड अलर्ट, यलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिले जातात, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहता येईल. पण, जे हवामान खाते हवामानाचे असे भाकीत करते, त्यांना कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तवता येतो, याचा आपण क्वचितच विचार केला जाईल. पाऊस कुठे होणार, कसा होणार व किती होणार, यासाठी हवामान खात्याकडे अद्यावत प्रणाली असते आणि याच माध्यमातून ते याचा अंदाज वर्तवत असतात.
तसे पाहता, मान्सून देशभरातील प्रत्येकासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा असतो. शेतकर्‍यांचे सारे गणित तर यावरच अवलंबून असते. अशावेळी हवामान खात्याकडून येणारी माहिती अर्थातच महत्त्वाची असते. मान्सून एखाद्या राज्यात केव्हा धडकणार, किती दिवस असणार, किती सरासरीचे पाऊस पडणार, हे त्यातून कळत असते. आता ते यासाठी कोणते उपकरण वापरतात ते ही लक्षवेधी आहे. तसे पाहता, हवामानाच्या अंदाजासाठी अनेक घटक जबाबदार असतात.
भविष्यात जेव्हा जेव्हा हवामानाबद्दल सांगायचे असते किंवा भाकीत करायचे असते, त्यावेळी विविध उपकरणांच्या साहाय्याने वातावरणाचे तापमान आणि जमिनीचा पृष्ठभाग, आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि दिशा, दव, ढगांची स्थिती इत्यादी तपासले जातात. यासाठी अनेक साधनेही वापरली जातात. उदाहरणार्थ, जेव्हा पाऊस ओळखायचा असतो तेव्हा पावसाचा मापक वापरला जातो, वार्‍याचा वेग मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर, वार्‍याची दिशा मोजण्यासाठी पेन-इव्हपोरिमीटर, सनलाईट रेकॉर्डर, दव मोजण्यासाठी दव मापक, जमिनीचे तापमानासाठी वापरले जाते आणि त्या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो.