आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
श्रीगणेश सांगतात की, वारसा हक्काने मिळणार्या संपत्तीवर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कामात व्यस्त राहाल. धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा राहील. तुमच्या कामांची चर्चा करु नका, अन्यथा कोणीतरी त्यांचा गैरफायदा घेईल. कोणाचाही कामात ढवळाढवळ करु नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
वृषभ : व्यवसायात नवीन यश लाभेल
नातेसंबंधात सुधारणा करण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागेल, असा सल्ला श्रीगणेश देतात. तरुणांच्या करिअरची चिंता दूर होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. परस्पर समंजसपणाने समस्या सुटतील. व्यवसायात नवीन यश लाभेल. मार्केटिंगशी संबंधित कामांना प्राधान्य द्या. कामात किरकोळ अडचणी येतील.
मिथुन : समस्यांवर तोडगा सापडेल
आज मित्र आणि नातेवाईकांची भेट लाभदायक ठरेल. समस्यांवर तोडगा सापडेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. संशयी स्वभावामुळे तुमचे नुकसान होवू शकते. कोणत्याही प्रकारचा प्रवास लांबणीवर टाका, असा सल्ला श्रीगणेश देतात. आयात-निर्यातीच्या कामात गती येईल. व्यवसायातील तुमच्या योजना संबंधित धोरण तयार करा.
कर्क व्यावसायिक बाबींमध्ये निष्काळजीपणा दाखवू नका
आज कुटुंबाबरोबरच व्यवसायातही योग्य सुसंवाद राखाल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये जवळीकता येईल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवेल. विनाकारण कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण करु नका. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ल्याचा आदर करा. कार्यालयाशी संबंधित कामाचा ताण अधिक असेल.व्यावसायिक बाबींमध्ये कोणतीही निष्काळजीपणा दाखवू नका, विपणन आणि संपर्क स्रोत मजबूत करा, अशी सूचना श्रीगणेश करतात.
सिंह: वडिलांच्या मालमत्तेबाबत कोणतीही निर्णय घेवू नका
आज ग्रहांची स्थिती अनुकूल असेल. नियोजित कामांना गती दिल्याने आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा होईल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमचे योगदान चांगले राहील. वडिलांच्या मालमत्तेबाबत वाद असल्यास कोणतीही निर्णय घेवू नका. कार्यक्षेत्राच्या अंतर्गत मांडणीत काही बदल करणे फायदेशीर ठरेल.
कन्या : आज वेळेचा सदुपयोग करा
आज वेळेचा सदुपयोग करा. मुले अभ्यासाबाबत गंभीर होतील. कामाचा अति ताणामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करताना कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे कार्यक्षेत्रात पूर्ण समर्पण असेल. किरकोळ गैरसमजांमुळे भागीदारी व्यवसायात मतभेद निर्माण होण्याची शक्यता.
तूळ : कोणताही प्रश्न संयमाने सोडवा
श्रीगणेश सांगतात की, आज प्रलंबित सरकारी कामे पूर्ण करा. सकारात्मक विचारांमुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आनंददायी वेळ जाईल. कोणताही प्रश्न संयमाने सोडवा. व्यवसायाशी संबंधित सर्व कामे तुमच्या देखरेखीखाली करा. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ व्यतित करा. गुडघेदुखीची तक्रार जाणवेल.
वृश्चिक : तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधीही मिळू शकतात
श्रीगणेश म्हणतात की, आज सामाजिक कार्यातील सहभाग तुमची प्रतिष्ठा वाढवेल. तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधीही मिळू शकतात. मुलांसमोर नकारात्मक मुद्दे उपस्थित करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे. मेहनतीला अनुकूल फळ मिळेल.
धनु : कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका
श्रीगणेश सांगतात की, आज उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यतात कर्ज दिलेले पैसे परत मिळण्याची उत्तम शक्यता आहे. ध्येयपूर्तीसाठी समर्पित वृत्तीने काम करा. तरुणाई करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. व्यवसायात नवीन प्रयोग राबविणे फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करु नका. एखाद्याला पैसे देण्यापूर्वी, परतावा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
मकर : ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त राहील
उत्पन्नाचा थांबलेला स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. नातेवाईकांशी असणारे जुने मतभेद मिटतील. अति भावनेच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका. नवीन गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करा. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क होईल, अनुचित कामे टाळा. ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
कुंभ : व्यवसाय व्यवस्थेत काही बदलाची आवश्यक जाणवेल
कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल, असे श्रीगणेश म्हणतात. आर्थिकदृष्ट्या अडचणी येतील. कोणीतरी तुमच्या उदारतेचा फायदा घेऊ शकते. व्यवसाय व्यवस्थेत काही बदलाची आवश्यक जाणवेल. याचा भविष्यात फायदा होईल.
मीन : कुटुंबातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्याल
श्रीगणेश म्हणतात की, आज सामाजिक कार्यात सहभाग नोंदवाल. कुटुंबातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्याल. अनोळखी व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. व्यवसायात काही नवीन करार होण्याची शक्यता; पण घाईत कोणताही निर्णय घेवू नका. ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.