जळगाव : व्यापाऱ्याला लुटले; ७ लाखांची बॅग घेवून चोरटे पसार
जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे येथील व्यापारी कारने ६ लाख ९५ हजार रूपये घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कारला अडवून रोकड लाबवली . पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर सोमवारी (दि.११) ही घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील योगेश वाल्मीक पाटील हे स्वीफ्ट कार (एम एच -०१-बी. टी.८७९६) ने तामसवाडी (ता. पारोळा) येथे शेतक-याची कापसाची उधारी देण्यासाठी पैसे घेऊन निघाले होते. पारोळा तालुक्यातील कराडी गावाचे अलीकडे १ कि.मी अंतरावर नंबरप्लेट नसलेल्या दोन दुचाकीवरून चौघेजण आले. व त्यांनी कार अडवून कारची चावी काढून घेतली. त्यांनतर धमकी देत कारमधून बँग हिसकावून घेत बोळे गावाकडे पलायन केले. या बँगेत ६ लाख ९५ हजार रूपये होते. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग बसावे हे तपास करीत आहेत.