गोंदिया : आर्थिक देवाण-घेवाणीतून प्रॉपर्टी डिलरचा खून

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शहरातील छोटा गोंदिया परिसरात महेश दखने (वय ३५) या युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना रविवार (दि. ९) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून अवघ्या काही तासातच चार आरोपींना …

गोंदिया : आर्थिक देवाण-घेवाणीतून प्रॉपर्टी डिलरचा खून

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील छोटा गोंदिया परिसरात महेश दखने (वय ३५) या युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना रविवार (दि. ९) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून अवघ्या काही तासातच चार आरोपींना ताब्यात घेत खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान, महेश दखने हा प्रॉपर्टी डिलींगचे काम करत असतानाच आर्थिक देवाण-घेवाणीतून त्याचा खुन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज, (दि. १०) पत्रकार परिषदेतून दिली.
देवेंद्र उर्फ देवा तुलाराम कापसे (वय ४८ रा. आंबाटोली, गोंदिया), सुरेंद्र हरिदास मटाले ( वय ३२ रा. शिवनी ता. आमगाव), मोरेश्वर चैतराम मटाले (वय २६ रा. मोहगाव, ता. आमगाव) नरेश नारायण तरोणे (वय ३८ रा. फुलचूर नाका गोंदिया) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मृत महेश दखने हा जमीन खरेदी-विक्रीची कामे करीत होता, तर घटनेच्या वेळी रविवारी शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक, छोटा गोंदिया येथील जानवी ऑटो रिपेअरिंग सेंटरच्या या दुकानात महेश दुचाकी क्रमांक (एमएच ३५ एव्ही ९५५०) ने गेला असता त्या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्याचा घेराव करून त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा, कुऱ्हाड आदी हत्यारांनी वार केले. यामध्ये महेश दखणे हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. यावेळी घटनास्थळावरून आरडा-ओरडा ऐकून काही लोक धावले, मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते.
दरम्यान, महेश दखणे यास बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु जास्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळ व रुग्णालय गाठून पंचनामा केला. या प्रकरणी कामिनी महेश दखने यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार केले. गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणावरून रविवारी दुपारी देवेंद्र कापसे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपरोक्त तीन आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास अटक केली. दरम्यान, देवेंद्र कापसे याने नरेश तरोणेच्या माध्यमातून आरोपी सुरेंद्र व मोरेश्वर यांना हत्येची सुपारी दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, नरेश तरोणे याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह एकूण सात गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत.
 खून आर्थिक देवाण-घेवाणीतून..
या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने चार आरोपींना अटक केली. महेश दखने हा प्रॉपर्टी डिलींगचे काम करायचा तर यातूनच आरोपी व मृत महेश यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद असल्याचे पुढे आले आहे. तर याच कारणातून हे हत्याकांड घडले असल्याचे गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिनी बानकर यांनी पत्र परिषदेत सांगितले.
१५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
यातील चारही आरोपींना सोमवारी (ता. 10) न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने त्यांना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.