नागपुरात सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या प्रकरणात सोमवारी (दि.१०) दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. एअर अरेबिया फ्लाइट (क्र. G9-415) ने शारजावरून नागपूरला येत असलेल्या या दोघांनी सोन्याच्या बिस्किटांसह अनेक महागडे मोबाईल लपवून आणले होते. दोघांची झडती घेण्यात आली. त्यावेळी दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे दोन गोल्ड बिस्कीट आणि मोबाईल आढळून आले. मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 ने शारजावरून नागपूरकडे निघालेल्या विमानात दोन प्रवाशांची वागणूक संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला मिळाली. त्यानंतर नागपूर विमानतळावर शारजावरून आलेल्या दोघांवर पाळत ठेवण्यात आली. दोघांच्या हालचालीवर पथकाला संशय आल्याने चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ २०० ग्राम सोन्याचे बिस्कीट आणि काही आयफोनसह विदेशी मूळच्या सिगारेटचे पाकिट जप्त करण्यात आले. या कारवाईत २४ कॅरेट २०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत ही १४ लाख २० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय १८ लाख ६१ हजार ९३० रुपये किमतीचे २० आयफोन जप्त करण्यात आले. दोन लाख किमतीच्या विदेशी मूळच्या सिगारेटही जप्त करण्यात आल्या. ही कारवाई नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटने केली.
हेही वाचा :
दुर्दैवी: विक्रोळी येथे इमारतीचा भाग कोसळून पितापुत्राचा मृत्यू
धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या नंदुरबारच्या तरुणाला अटक
Monsoon Update Malegaon | मालेगाव तालुक्यात वीज पडून 15 जनावरे दगावल्याने पशुधनाचे नुकसान