धुळ्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू; शिवसेना शिंदे गटाकडून निदर्शने

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्याच आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात खुशी नावाच्या बालिकेचा मृत्यू झाला. त्यामुळे सोमवारी (दि.10) शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आठ दिवसात करावा. असे न केल्यास अधिकारी आणि संबंधितांच्या दालनात कुत्रे सोडले जातील, असा इशारा शहर प्रमुख …

धुळ्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू; शिवसेना शिंदे गटाकडून निदर्शने

धुळे, Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्याच आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात खुशी नावाच्या बालिकेचा मृत्यू झाला. त्यामुळे सोमवारी (दि.10) शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आठ दिवसात करावा. असे न केल्यास अधिकारी आणि संबंधितांच्या दालनात कुत्रे सोडले जातील, असा इशारा शहर प्रमुख संजय वाल्हे यांनी दिला आहे.
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये देवपुरातील बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक होत महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी महानगरपालिका प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला आहे. शहरात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. शहरात 7 कुत्र्यांच्या टोळक्याने 1 वर्षाच्या खुशी नामक बालिकेला चावा घेऊन जीव घेतला आहे.
याआधी 29 एप्रिल दिवशी दत्तमंदिर चौकाजवळ सदाशिव नगरात मोकाट कुत्र्यांनी २ मुलीनां चावा घेऊन गंभीर दुखापत केली होती. शहरात रोजच पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्री बेरात्रीतर मोटर सायकलवर जाणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे टोळक्यांनी हल्ला करतात. त्यामुळे दुचाकी चालकांना जिव धोक्यात घालून दुचाकी चालवावी लागते. यामध्ये काही नागरिकांचा अपघात देखील झाला आहे.
धुळे शहरात मे महिन्यामध्ये 172 नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरातील चौका- चौकात प्रमुख रस्त्यावर सर्व मांस विक्रेत्यांच्या दुकाना जवळ, आजू बाजूच्या परिसरात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या रस्ता आडवून बसलेल्या असतात. या सर्वाकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :

मानवत तालुक्यात पावसाचे थैमान; ओढ्याच्या पुरात एक महिला बेपत्ता
तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करण्याऱ्या डॉ. अशोक बागुलांना काही तासांतच जामीन !
नाशिक : आर्थिक समावेशनाला एनबीएफसीकडून भन्नाट गती