जळगाव : ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी चाळीसगावात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने होत असताना आता विद्यार्थ्यांनी थेट नीट परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. दोन विद्यार्थ्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नीट परिक्षेचा पेपर लिक होवून देखील काहीच कारवाई होत नसल्याने हजारो विद्यार्थी संतप्त झाले आहेत. चाळीसगाव येथे शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१०) …
जळगाव : ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी चाळीसगावात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने होत असताना आता विद्यार्थ्यांनी थेट नीट परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. दोन विद्यार्थ्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नीट परिक्षेचा पेपर लिक होवून देखील काहीच कारवाई होत नसल्याने हजारो विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
चाळीसगाव येथे शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१०) रस्त्यावर उतरत नीट परिक्षा रद्द करून ती पुन्हा घ्यावी व प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिले.
बारावीनंतर मेडिकल क्षेत्रात ऍडमिशन घेणार्‍या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा घेण्यात येते आणि याच परीक्षेत काही गोंधळ झाला असल्याचा आरोप राज्यातील विद्यार्थ्यांनी केला आहे.
भारतात हरियाणा, गुजरात, बिहार यासह अनेक ठिकाणी नीट-2024 चे पेपर लीक झाले असून त्याचे पुरावे मिळून देखील एनटीएने त्याचा स्वीकार केला नाही.या परिक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दिवशीच लावण्यात आला. म्हणजे लोकसभा निकालाच्या आड परीक्षेत झालेला भ्रष्टचार खपवून घेतला जाईल व कोणाचे लक्ष जाणार नाही अशी थेअरी वापरण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
ही पूर्ण परिक्षा व यातील एनटीएची भूमिका संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झालेला आहे. रात्रंदिवस मेहनत करून मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र एक करून लाखो मुले मेहनत करूनही शैक्षणिक पात्रता असून देखील वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे पैशाच्या जोरावर पेपर विकत घेऊन ज्यांची पात्रता नाही, अशी मुले डॉक्टर बनली तर देशाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नीट-2024 परीक्षा रद्दबातल करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.