भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही : शरद पवार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं संबोधित केलं होत. या टीकेला सोमवारी (दि. १०) शरद पवार यांनी प्रत्तुत्तर दिले. हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असं प्रत्तुतर त्यांनी यावेळी दिलं. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन पार पडला. यावेळी ते बोलत होते.