जनावरांसाठी चारा उपलब्ध करा ; शेतकर्‍यांची सहकारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट झाल्यामुळे चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी वडगाव पीर, मांदळेवाडी, लोणी धामणी, पोंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. वडगाव पीर, मांदळेवाडी, वाळुंजवाडी, पोंदेवाडी, लोणी धामणी परिसरात रविवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात … The post जनावरांसाठी चारा उपलब्ध करा ; शेतकर्‍यांची सहकारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी appeared first on पुढारी.
#image_title

जनावरांसाठी चारा उपलब्ध करा ; शेतकर्‍यांची सहकारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट झाल्यामुळे चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी वडगाव पीर, मांदळेवाडी, लोणी धामणी, पोंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. वडगाव पीर, मांदळेवाडी, वाळुंजवाडी, पोंदेवाडी, लोणी धामणी परिसरात रविवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी, मका, कडवळ, गवत या चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.
पावसामुळे चारापिके खराब झाली आहेत. विकतचा चारा घेणे शेतक-यांना परवडत नाही. त्यातच दुधाला भाव नाही. या भागात चारा छावणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
वळसे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, कृषी अधिकारी यांना जनावरांच्या चार्‍यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्‍यांनी पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणी केली.
हेही वाचा :

Bidri Sakhar Karkhana : दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला
भारतीय अंतराळवीरांना मदत करणार

The post जनावरांसाठी चारा उपलब्ध करा ; शेतकर्‍यांची सहकारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी appeared first on पुढारी.

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट झाल्यामुळे चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी वडगाव पीर, मांदळेवाडी, लोणी धामणी, पोंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. वडगाव पीर, मांदळेवाडी, वाळुंजवाडी, पोंदेवाडी, लोणी धामणी परिसरात रविवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात …

The post जनावरांसाठी चारा उपलब्ध करा ; शेतकर्‍यांची सहकारमंत्री वळसे पाटलांकडे मागणी appeared first on पुढारी.

Go to Source