४० वर्षांनंतर अंटार्क्टिकातून सर्वात मोठा हिमनग ‘मुक्त’

४० वर्षांनंतर अंटार्क्टिकातून सर्वात मोठा हिमनग ‘मुक्त’

सिडनी : जगातील सर्वात मोठा हिमनग अशी ‘ए23ए’ या हिमनगाची ख्याती आहे. अंटार्क्टिकामधील हा हिमनग 1986 मध्ये फुटला होता. न्यूयॉर्क शहरापेक्षा तिप्पट मोठ्या आकाराचा हा हिमनग जवळजवळ 40 वर्षांनंतर आता अंटार्क्टिकाच्या किनार्‍यापासून मुक्त झाला असून, तो आता समुद्रात पुढे सरकू लागला आहे.
हा हिमनग म्हणजे बर्फाचे एक बेटच आहे. तो दुभंगून आणि वितळून जाण्यापूर्वी अनेक पेंग्विन पक्ष्यांचे आश्रयस्थान बनेल. या हिमनगाचा पृष्ठभाग 4 हजार चौरस किलोमीटरचा आहे. फिल्चनर आईस शेल्फ दुभंगल्यानंतर 1986 मध्ये त्याची निर्मिती झाली होती. मात्र, त्याचा पाण्याखालील मोठा भाग वेड्डेल समुद्राच्या तळाशी अडकल्याने तो किनार्‍याजवळच अडकून राहिला होता.
या हिमनगाला आतापर्यंत अनेक वेळा ‘जगातील सर्वात मोठा हिमनग’ हा किताब मिळालेला आहे. मेरीलँड युनिव्हर्सिटीतील तसेच ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील ग्लेशियोलॉजिस्ट ख्रिस्तोफर शुमन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आता जूनमध्येच त्याला पुन्हा एकदा हा किताब मिळाला आहे. तत्पूर्वीचा सर्वात मोठा हिमनग ‘ए76ए’ फुटल्यानंतर व तो सागरी प्रवाहांसोबत विषुववृत्ताच्या दिशेने वाहून गेल्यावर ‘ए23ए’ला पुन्हा एकदा हा किताब मिळाला.
The post ४० वर्षांनंतर अंटार्क्टिकातून सर्वात मोठा हिमनग ‘मुक्त’ appeared first on पुढारी.

सिडनी : जगातील सर्वात मोठा हिमनग अशी ‘ए23ए’ या हिमनगाची ख्याती आहे. अंटार्क्टिकामधील हा हिमनग 1986 मध्ये फुटला होता. न्यूयॉर्क शहरापेक्षा तिप्पट मोठ्या आकाराचा हा हिमनग जवळजवळ 40 वर्षांनंतर आता अंटार्क्टिकाच्या किनार्‍यापासून मुक्त झाला असून, तो आता समुद्रात पुढे सरकू लागला आहे. हा हिमनग म्हणजे बर्फाचे एक बेटच आहे. तो दुभंगून आणि वितळून जाण्यापूर्वी अनेक …

The post ४० वर्षांनंतर अंटार्क्टिकातून सर्वात मोठा हिमनग ‘मुक्त’ appeared first on पुढारी.

Go to Source