लासलगाव; पुढारी वृत्तसेवा येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज येवला लासलगाव मतदारसंघात आले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला.
लासलगाव जवळील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ना. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. ‘छगन भुजबळ गो बॅक’, च्या घोषणा मराठा आंदोलकांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत ना. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध केला. या वेळी पोलिसांनी कडे तयार करून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आवर घातला. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्यासह लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या तीन गाड्या, दहा ते बारा पोलिस पथकाच्या मोठ्या गाड्यांमधून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भुजबळ दौरा अर्धवट सोडून…
यावेळी परिस्थिती बघता छगन भुजबळ हे कोटमगाव येथे न थांबता मोठ्या पोलिस बंदोबस्तात सरळ वनसगाव व थेटाळे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र त्याठिकाणी सुध्दा ना. छगन भुजबळ यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत गावात प्रवेश नाकारला. या नंतर ना. भुजबळ यांनी याठिकाणी सुध्दा नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता हा दौरा अर्धवट सोडून सरळ नाशिकच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी मराठा समाजाचे डॉ. सुजित गुंजाळ, ललित दरेकर, शिवा पाटील सुरासे, रवी होळकर, प्रमोद पाटील प्रमोद पवार, प्रवीण कदम, संतोष पानगव्हाणे, अनिरुद्ध होळकर, विकास रायते, तुकाराम गांगुर्डे यांच्यासह असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
Indian Air Force: संरक्षण मंत्रालयाने ९७ ‘तेजस’ विमाने, १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीला दिली मंजूरी : सूत्र
Hurun self-made entrepreneurs list | D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी
ललित पाटील प्रकरणात सरकारचा हात असल्याचे सगळ्यांना माहिती : जयंत पाटील
The post काळे झेंडे, गो बॅक’च्या घोषणा; भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला… appeared first on पुढारी.
लासलगाव; पुढारी वृत्तसेवा येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज येवला लासलगाव मतदारसंघात आले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला. लासलगाव जवळील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ना. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत …
The post काळे झेंडे, गो बॅक’च्या घोषणा; भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला… appeared first on पुढारी.