देशातील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 10 जुलैला मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Assembly By-Elections : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) सोमवारी (दि. 10) पश्चिम बंगालमधील चार जागांसह सात राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार असल्याचे ईसीआयने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील …

देशातील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 10 जुलैला मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Assembly By-Elections : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) सोमवारी (दि. 10) पश्चिम बंगालमधील चार जागांसह सात राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार असल्याचे ईसीआयने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1, हिमाचलमधील 3, बिहारमधील 1 आणि बंगालमधील 4 जागांवर 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
या जागांची अधिसूचना 14 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 जून निश्चित करण्यात आली आहे. 24 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 10 जुलैला मतदान होणार असून 13 जुलैला निकाल लागणार आहे. नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या.
लोकसभेच्या 543 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 240 जागा जिंकल्या, पण स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना पूर्ण बहुमताचा आकडा गाठता आला नाही. असे असले तरी भाजपने त्यांच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून तर त्यांच्यासोबत 71 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Go to Source