गोंदिया: मिलटोलीत खासगी बसचा भीषण अपघात; १ ठार, ११ जखमी

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ आज ( दि. 10 ) सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर तर 6 जण किरकोळ जखमी झाले. थानसिंग यादव ( वय …

गोंदिया: मिलटोलीत खासगी बसचा भीषण अपघात; १ ठार, ११ जखमी

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ आज ( दि. 10 ) सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर तर 6 जण किरकोळ जखमी झाले. थानसिंग यादव ( वय 30 रा. रेलवाडी जि. बालाघाट, म.प्र.) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रॅव्हल्स चालक मोहित उमाप्रसाद किरसान (रा. उगली/ शिवनी म.प्र.) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील लांजी येथून हैदराबाद करीता खासगी ट्रॅव्हल्स चालविण्यात येत असून दरदिवशी शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कंस्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजुरांची हैदराबाद येथे ने-आन करण्यात येते. त्यातच आज, सकाळी हैदराबाद वरून जवळपास 50 ते 60 प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी 13 पी 7999 परत लांजीकडे जात असताना गोंदिया व गोरेगावच्या मध्ये राष्ट्रीय महामार्गावर मिलटोली परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. यावेळी, रस्त्याच्या कडेवरील राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला बस धडकली. ज्यामध्ये चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले 12 मजूर गंभीर जखमी झाले. यावेळी, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात भर्ती करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना थानसिंग यादव याचा मृत्यू झाला. तर 11 गंभीर प्रवाश्यांवर उपचार सुरु असून 6 किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.

अपघातातील  जखमींची नावे

ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असताना साहिल धनलाल काळसर्पे (वय 22), गजानन उईके (वय 24), अशोक काटीवाल (वय 21) सर्व राहणार बालाघाट, गीता लटारे (वय 38 रा. लांजी), जयपाल गावड ( वय 39 रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे ( वय 40 रा. परसवाडा), राजेश पुसाम (वय 26 रा. भजेपार), शैलेश परते (वय 32 रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरुराम नागपुरे (वय 50) दोघेही वारासिवनी अशी गंभीर जखमींची नावे असून बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व राहणार नरसाळा/वारासिवनी, जि. बालाघाट, म.प्र.) किरकोळ जखमी झाले आहेत.

मोठा अनर्थ टळला…

हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका राईस मिलमध्ये काम करणार्‍या मजुरांच्या क्वार्टरला धडकली. ज्यामध्ये संपूर्ण क्वार्टरची तुटातुट झाली. यावेळी, सुदैवाने सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

या ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचे…

गेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत असून दरदिवशी सायंकाळी लांजी येथून तर हैदराबाद वरून रात्री 2 वाजता बस सोडण्यात येत असून रात्रभर प्रवास केला जातो. ज्यामध्ये अनेकदा चालकाला झोपेची झपकी येउन वाहनावरील नियंंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलीस व परिवहन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येते, तेव्हा या ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.