अपक्ष दराडे अद्याप गायब; कुटुंबीय करणार आज तक्रार

अपक्ष दराडे अद्याप गायब; कुटुंबीय करणार आज तक्रार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी अर्ज भरल्यानंतर नामसाधर्म्य असल्याने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिस संरक्षणात त्यांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. नंतर ते गायब झाले असून, त्यांचे अपहरण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप ते घरी आलेले नसून सोमवारी सकाळी पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे बंधू सुनील दराडे यांनी दिली आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये अर्ज भरल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे यांनी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांसह निघून गेले. मात्र, नामसाधर्म्याचे अपक्ष उमेदवार असलेल्या किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरलेला असल्याने आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ विभागीय आयुक्त कार्यालय गाठत संबंधित अपक्ष उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. याबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करत अपक्ष उमेदवार दराडेंना पोलिस संरक्षणात बाहेर नेण्यात आले. मात्र, दोन दिवसांपासून ते अद्याप घरी पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अद्याप हरवल्याची तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र, रविवारी रात्रभरातून आले नाही तर सोमवारी (दि. १०) तक्रार करू, असे सांगितले आहे.
दराडेंना बाहेर नेण्यात आल्याची चर्चा
अपक्ष दरांडेंचे अपहरण झाले असून, त्यांना बाहेर नेण्यात आले असल्याची चर्चा कोपरगावमध्ये रंगली आहे. चौकाचौकांमध्ये विद्यमान आमदार दराडेंनी त्यांना पळवले असावे किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार कोल्हेंनी डमी उमेदवार उभा केला का ? अशादेखील चर्चांना आता ऊत आला आहे.
हेही वाचा:

Nashik Teacher Constituency Election | आज अर्ज छाननी, बुधवारपर्यंत माघारी
Mango Export News | नाशिकमधून ऑस्ट्रेलिया, अमेरिकेला एक हजार टन आंबे निर्यात