५० खोके सरकारला लागू होत असेल जनतेला नाही : सुप्रिया सुळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील धनशक्तीला जनतेनं नाकरलं आहे. संविधानानेच देश चालेल हे जनतेनं सिद्ध करून दाखवलं. ५० खोके एकदम ओके हे सरकारला लागू होत असेल पण जनतेला नाही. देशातील जनता स्वाभिमानी आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पक्षाच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच पुणे येथे राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन साजरा …

५० खोके सरकारला लागू होत असेल जनतेला नाही : सुप्रिया सुळे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशातील धनशक्तीला जनतेनं नाकरलं आहे. संविधानानेच देश चालेल हे जनतेनं सिद्ध करून दाखवलं. ५० खोके एकदम ओके हे सरकारला लागू होत असेल पण जनतेला नाही. देशातील जनता स्वाभिमानी आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच पुणे येथे राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्ते आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुण्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. येथे प्रशासनच नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याची आण, बाण, शान गेली आहे. खून, गाड्या फोडणे अशा घटना रोजच घडत आहेत. याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असे खासदार सुळे म्हणाल्या.

#WATCH | Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar, MP-elect Supriya Sule and other party leaders attend the NCP-SCP Foundation Day program in Pune. pic.twitter.com/oCzHoD0mEn
— ANI (@ANI) June 10, 2024

हेही वाचा : 

अजित पवार भाजपचे गुलाम : संजय राऊत
प्लॅन तयार; महायुतीचे सरकार पुन्हा विधानसभेत आणू : फडणवीस