‘पोर्शे’ कार अपघातातील बिल्‍डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या अगरवाल बिल्डरसह पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ९) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी व इतर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या …
‘पोर्शे’ कार अपघातातील बिल्‍डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या अगरवाल बिल्डरसह पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ९) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी व इतर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सोसायटीधारक विशाल अडसूळ (वय ४२, रा. नॅन्सी ब्रम्हा सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अडसूळ बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा या सोसायटीमध्ये राहतात. दरम्यान, आरोपींनी आपसात संगनमत करून सोसायटीधारकांची कोणतीही परवानगी न घेता सोसायटीच्या मालकीच्या मोकळ्या जागेत दोन इमारती उभारल्या. त्यासाठी नकाशा व इतर कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल केले. अशा प्रकारे संशयीत आरोपींनी ७१ सोसायटी धारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
हेही वाचा : 

‘एनडीए’ सरकारला शेअर बाजाराचा ‘सॅल्यूट’! सेन्सेक्स-निफ्टीची उच्‍चांकी झेप

लग्नानंतर पाचव्या दिवशी दागिन्यांसह दोन नववधू पसार 
पीपीएफवर कर्ज घेताय?