Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास 12 वर्षांचा कारावास
राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील एका गावात 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या परप्रांतीय तरुणास राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेंद्र कैलास वर्मा (वय 22, रा. कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या पालकांनी वर्मा विरोधात चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जुलै 2015 रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुरेंद्र वर्मा याने पीडित मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने तिच्या आई-वडील व नातेवाईक, शेजार्यांनी शोध घेतला. या वेळी टेरेसवर वर्मा हा मुलीसोबत आढळून आला. त्यांनी वर्माला पकडून चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार वर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांनी तपास केला.
हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. पी. पोळ यांच्या पुढे सुरू होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही. एन. देशपांडे यांनी 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, डॉक्टर, फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. न्यायाधीश पोळ यांनी वर्माला 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयीन कामकाज पोलिस कर्मचारी योगिता गावडे यांनी पाहिले.
– अविनाश सावंत, सामाजिक कार्यकर्ते, काटेवाडी.
The post Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास 12 वर्षांचा कारावास appeared first on पुढारी.
राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील एका गावात 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या परप्रांतीय तरुणास राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेंद्र कैलास वर्मा (वय 22, रा. कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या पालकांनी …
The post Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास 12 वर्षांचा कारावास appeared first on पुढारी.