निवडणूक शिक्षक आमदाराची; चर्चा राजकीय पक्षांची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेवर शिक्षक प्रतिनिधी असावा, यासाठी विधान परिषदेच्या एकूण संख्येच्या १/१२ प्रतिनिधी शिक्षक मतदारसंघातून निवडलेला असावा, अशी तरतूद संविधानात आहे. मात्र, सध्या या निवडणुकीमध्ये संस्थाचालक, राजकारणी उतरले असून, नाशिक विभागातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये १४ अर्ज राजकीय पक्षांच्या एबी फॉर्मसह, तर ३९ अर्ज …

निवडणूक शिक्षक आमदाराची; चर्चा राजकीय पक्षांची

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेवर शिक्षक प्रतिनिधी असावा, यासाठी विधान परिषदेच्या एकूण संख्येच्या १/१२ प्रतिनिधी शिक्षक मतदारसंघातून निवडलेला असावा, अशी तरतूद संविधानात आहे. मात्र, सध्या या निवडणुकीमध्ये संस्थाचालक, राजकारणी उतरले असून, नाशिक विभागातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये १४ अर्ज राजकीय पक्षांच्या एबी फॉर्मसह, तर ३९ अर्ज हे अपक्षांचे आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करून त्यांना एबी फॉर्म दिला. तरी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने या जागेवर दिलीप पाटील यांना उमेदवारी दिली. तसेच शरद पवार गटातर्फे रतन चावला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपकडून उमेदवारीचा विसपुतेंचा दावा
महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे, तर महेंद्र भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. भाजपचे धनराज विसपुते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पक्षाकडून अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावा विसपुते यांनी केला आहे. यासोबत अपक्षांमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला असला, तरी त्यांचे राजकीय संबंध बघता, त्यांना राजकीय पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:

हिंगोली : हळदीच्या बियाण्याला डिमांड; दर पोहोचले 5 हजारांवर
जळगाव : “बुंदी संपली रे…..” म्हणणाऱ्या विरोधकांमध्ये लाडूवाटप करुन खडसे समर्थकांचे प्रतिउत्तर