जळगाव – नरेंद्र पाटील लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार रंगताना लोकसभा उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यावर विरोधकांनी बुंदी संपली बुंदी संपली अशी टीका करण्यात येत होती. मात्र आज केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा मानाचे स्थान देण्यात आल्यामुळे समर्थकांनी बुंदीचे लाडू वाटप करून विरोधकांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले आहे.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये रावेर मतदार संघामध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे विरोधामध्ये प्रचार करताना विरोधक “बुंदी संपली रे, बुंदी संपली” अशी जोरदार घोषणाबाजी करीत होते. मात्र लोकसभा निवडणुकीचा चार जून रोजी निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर रावेर लोकसभेच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार यांना केंद्रीय मंत्री मंडळातील स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जे विरोधक “बुंदी संपली रे, बुंदी संपली” अशी ओरड करीत होते. तेथेच आज मुक्ताईनगर मध्ये रक्षा खडसे यांच्या समर्थकांनी बुंदी लाडू वाटप करून विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.
हेही वाचा:
दीपिका पादुकोणचा शानदार अंदाज; ‘कल्कि 2898 AD’चं पोस्टर रिलीज
Jalgaon : कोथळी सरपंच ते नवी दिल्ली केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा रक्षा खडसे यांचा गौरवशाली प्रवास