आता आले, चक्क चिकन तंदुरी आईस्क्रीम!

नवी दिल्ली : सध्या उकाड्याने देशभरात नवे नवे विक्रम करण्याचा जणू चंगच बांधला आहे. अशा वेळी थंडगार आईस्क्रीमचे सेवन करणे कुणाला आवडणार नाही? मात्र, हल्ली ‘फ्युजन’च्या नावाखाली आणि सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आईस्क्रीमचेही भन्नाट प्रकार आले आहेत. कोणी मिरचीचं आईस्क्रीम बनवतेय, तर कोणी टोमॅटोचं, कोणी नूडल्सची कुल्फी बनवतंय, तर कुणी छोले पराठ्याचं आईस्क्रीम. पण, हे …

आता आले, चक्क चिकन तंदुरी आईस्क्रीम!

नवी दिल्ली : सध्या उकाड्याने देशभरात नवे नवे विक्रम करण्याचा जणू चंगच बांधला आहे. अशा वेळी थंडगार आईस्क्रीमचे सेवन करणे कुणाला आवडणार नाही? मात्र, हल्ली ‘फ्युजन’च्या नावाखाली आणि सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आईस्क्रीमचेही भन्नाट प्रकार आले आहेत. कोणी मिरचीचं आईस्क्रीम बनवतेय, तर कोणी टोमॅटोचं, कोणी नूडल्सची कुल्फी बनवतंय, तर कुणी छोले पराठ्याचं आईस्क्रीम. पण, हे सगळे पदार्थ कमी होते म्हणून की काय आता बाजारात एक नवं आईस्क्रीम आले आहे. या पदार्थाला ‘ चिकन तंदुरी आईस्क्रीम’ असे म्हटले जाते. होय, हे आईस्क्रीम चक्क चिकनपासून तयार केले जाते. हा अनोखा पदार्थ पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल!
हे आईस्क्रीम कसे तयार केले जाते, याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामधून दिसते की सर्वात आधी तंदुरी चिकन घेतलं. मग त्याचे बारीक तुकडे केले जातात. मग या तुकड्यांमध्ये दूध मिसळून (अय्यो!) चिकनचा लगदा तयार केला जातो. या लगद्यावर चॉको चिप्स आणि चॉकलेट सिरप टाकलं आणि मग हे मिश्रण एकजीव करून बर्फाच्या लादीवर पसरवलं. अन् त्यानंतर काही वेळातच हे मिश्रण गोठून तयार झालं चिकन तंदुरी आईस्क्रीम. हे अजब आईस्क्रीम एका ट्विटर अकाऊंटवरून शेेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला असून, जवळपास सर्वांनीच त्यावर जोरदार टीका केली आहे. कोणी म्हणतेय, आईस्क्रीमवर असे अत्याचार करणं थांबवा, तर कोणी ‘या गुन्ह्यासाठी देव तुम्हाला कठोर शिक्षा देईल’ अशी फिरकी घेतंय!