मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात नाशिकमधून निमंत्रण
सिडको (नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक चे स्वच्छतादूत पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील यांना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. पाटील हे नाशिक मध्ये गोदावरी नदी, नंदिनी नदी व शहर स्वच्छते साठी सातत्याने कार्य करत असतात.पंतप्रधानांनी आपल्या लोकप्रिय कार्यक्रम मन की बात मध्ये सुद्धा त्यांचे “स्वच्छाग्रही” म्हणून कौतुक केले आहे. पाटील हे दिल्लीकडे शनिवार (दि.८) रोजी रवाना झाले आहेत.
हेही वाचा:
Nashik Accident News | लक्झरी बस-ट्रक अपघातात एक ठार, सहा जखमी
अरबी समुद्रात २३ ते २५ जून उसळणार महाकाय लाटा