Nashik: लक्झरी बस-ट्रक अपघातात एक ठार, सहा जखमी

Nashik: लक्झरी बस-ट्रक अपघातात एक ठार, सहा जखमी

येवला (नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – नाशिक- संभाजीनगर राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाने येथे शनिवारी (दि. ८) सकाळी 8 च्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन लक्झरी बसचालक जगदीश जाट (४०, रा. जयपूर) हा ठार झाला, तर बसमधील सात प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार लक्झरी बस (क्र. एमपी ३०, पी ०३९७) ही जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे ६० भाविकांना घेऊन केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री, दोन धाम यात्रेस निघाली होती. शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे यात्रेचा शेवट करून ते घराकडे निघाले होते. दरम्यान, देशमाने येथे गोई नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने ही रहदारी एकेरी असल्याने जालन्याहून लासलगावकडे खतांच्या गोण्या घेऊन येणारा ट्रक (एमएच ४३, यू ३२३२) आणि नाशिकहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाला एकेरी रहदारीचा अंदाज न आल्याने धडक होऊन बस दुभाजकाजवळ कट करून शेजारील शेतात गेली. यात बसचालक ठार झाला, तर अन्य सहा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच येवला तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बहीर, पोलिस कर्मचारी सागर बनकर, पाटील आदींनी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ट्रकच्यादेखील पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पावसाने शेतजमीन ओली असल्याने बस शेतात जाताच फसून राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
जखमींमध्ये संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील भाविक
जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे ६० भाविक केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री दोन धाम यात्रा करून शेवटी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन लक्झरी बसने घराकडे निघाले होते. मात्र, देशमाने येथे गोई नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने चालकास रहदारीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.
हेही वाचा:

Nashik Water Drowned News | पाण्याने घेतला दोन चिमुरडींचा जीव
शोध सुखाचा! : ‘जर… फक्त!’