ठाणे : साई शिर्डीनगर एक्स्प्रेसमध्ये चिमुरडी आढळली; पालकांचा शाेध सुरू
डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : साई शिर्डीनगर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (दि.८) दोन वर्षाची मुलगी आढळून आली. कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी या मुलीला एक्स्प्रेसमध्ये कुणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिलाचा संशय व्यक्त केला आहे. सध्या मुलीच्या पालकांचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, साई शिर्डी नगर एक्स्प्रेसमध्ये दोन वर्षांची मुलगी बुधवारी दुपारी एकटीच झोपलेल्या अवस्थेत प्रवाशांना आढळून आली. त्यानंतर प्रवाशांनी तिच्या पालकांचा शाेध घेतला मात्र, कुणीही पुढे आले नाही. त्यानंतर दादरला उतरून या चिमुरडीला दादर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीचा हात फ्रॅक्चर असल्याने पाेलिसांनी तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला बालगृहात नेण्यात आले. पोलिसांकडून चिमुरडीच्या पालकांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :
Accident News : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जवानांचा मृत्यू
बीड : माजलगाव येथील हिवरा बु. गावात वीज पडून ९ मेंढ्यांचा मृत्यू
छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी केले नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त