नकली आधार कार्डवर संसदेत घुसण्याचा प्रयत्न; तिघांना अटक
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : संसदेत नकली आधार कार्डवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मजुरांना सीआयएसएफच्या जवानांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. संसदेच्या गेट क्रमांक तीनजवळ बुधवारी (दि.4) दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासीम, शोएब आणि मोनीस अशी अटक केलेल्या मजुरांची नावे आहेत. त्यांच्यावर संसदेत घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संसदेत सध्या बांधकामाचे कार्य सुरु आहे. त्यासाठी हे 3 मजूर आले होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना आधार कार्ड दाखवण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी नकली आधारकार्ड दाखवले यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तिघांनाही शाहनवाज आलम नावाच्या कंत्राटदाराने कामावर घेतल्याची माहिती आहे. संसदेच्या सभागृहात 13 डिसेंबर रोजी दोन युवकांनी उड्या मारल्या होत्या. तेव्हापासून सुरक्षा बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आला आहे.
हेही वाचा :
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ‘सीएए’ कायदा अडचण ठरणार
नवी दिल्ली : मोदी सरकारला आरक्षण संपवायचे आहे म्हणूनच जनगणना केली नाही; काँग्रेसचा आरोप
नवी दिल्ली : कच्च्या तेलावरील विंडफॉल कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय