कल्याणच्या शिवसेना शहरप्रमुखांना धमकावल्याप्रकरणी एकास अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक तथा कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुरूवारी (दि.६) कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. दीपक भीमसेन कदम (वय ५४) असे त्याचे नाव आहे. मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या …

कल्याणच्या शिवसेना शहरप्रमुखांना धमकावल्याप्रकरणी एकास अटक

डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक तथा कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुरूवारी (दि.६) कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. दीपक भीमसेन कदम (वय ५४) असे त्याचे नाव आहे. मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना दिली.
संशयित आरोपी दीपक कदम याने फेसबूक अकाऊंटवरुन धमकी दिली होती. त्यानंतर महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडून चौकस तपास सुरू होता. या धमकीत महेश गायकवाड यांना असलेल्या राजकीय पाठबळाचा उल्लेख करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच धमकी प्रकरणाची नव्याने भर पडली आणि चर्चेला उधाण आले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सावध पवित्रा घेत कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या प्रकरणाचा तातडीने तपास करून गुरुवारी दीपक कदम याला अटक केली.
दीपक याची कसून चौकशी केली असता, तो मद्यपी असून त्याने दारूच्या नशेत महेश गायकवाड यांना धमकावल्याचे समोर आले. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि त्यातच त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आढळले. अटक आरोपी दीपक कदम हा महेश गायकवाड यांचा फेसबुक फ्रेंड असल्याचेही तपासात पुढे आले. दारूच्या नशेत आणि बिघडलेल्या मानसिक स्थितीमधून आपल्या हातून हा प्रकार घडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
हेही वाचा :

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठातील अपहार प्रकरणी चार कर्मचारी निलंबित
छ. संभाजीनगर: गंगापूर येथे बोगस कापूस बियाणे विक्रीप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा
Jalgaon Crime News | आधी लग्नाचे आमिष, नंतर बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार