अमित शहांना सांगून बावनकुळेंनीच माझे तिकीट कापले, कृपाल तुमानेंचा आरोप
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आले होते, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार कृपाल तुमाने यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. या आरोपामुळे महायुतीमध्ये बावनकुळे -तुमाने वाद पेटला आाहे.
तुमाने म्हणाले की, रामटेकची जागा शिवसेनेच्या हातून गेल्याचे आपल्याला दु:ख आहे. बावनुकळे यांच्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराला कामठीतून कमी मते मिळाली. शिवसेनेच्या पराभवाचे खरे व्हीलन बावनकूळे हेच आहेत. यासंदर्भात आपण अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमाने यांना तिकीट दिले तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेणार नाही, असे बावनकुळे यांनी अमित शाह यांना सांगितल्याचे मला समजले होते. पक्षाच्या सर्वेक्षणात ७६ टक्के लोकांनी माझ्या नावाला पसंती दिली होती. राजू पारवे यांच्या बाजूने केवळ १ टक्का लोक होते, असा दावाही तुमाने यांनी केला.
Home महत्वाची बातमी अमित शहांना सांगून बावनकुळेंनीच माझे तिकीट कापले, कृपाल तुमानेंचा आरोप
अमित शहांना सांगून बावनकुळेंनीच माझे तिकीट कापले, कृपाल तुमानेंचा आरोप
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आले होते, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार कृपाल तुमाने यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. या आरोपामुळे महायुतीमध्ये बावनकुळे -तुमाने वाद पेटला आाहे. तुमाने म्हणाले की, रामटेकची जागा …