Pune Drunk and Drive case: तावरे अन् मकानदारचे पाच महिन्यांत सुमारे ७० फोन

पुणे : पुढारी  वृत्तसेवा :  कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार, आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपत्सात मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशारत्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या गेल्या पाच महिन्यांपासून संपर्कात होता, त्यांचे एकमेकांचे ७० कॉल झाल्याची माहिती उपासातून समोर आली आहे. …

Pune Drunk and Drive case: तावरे अन् मकानदारचे पाच महिन्यांत सुमारे ७० फोन

पुणे : Bharat Live News Media  वृत्तसेवा :  कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार, आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपत्सात मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशारत्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या गेल्या पाच महिन्यांपासून संपर्कात होता, त्यांचे एकमेकांचे ७० कॉल झाल्याची माहिती उपासातून समोर आली आहे. यापूर्वीही दोघांनी मिळून कोही बेकादेशीर प्रकार केल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या अनुषंगानेदेखील आमचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
अश्फाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी रक्ताच्या नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यांना मुंबई येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी यापूर्वी ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशाख विभागातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, तर मुलाला वाचविणाऱ्या विशाल अगरवाल, मुलाचे म्हणून स्वतःचे रक्त देणाऱ्या शिवाणी अगरवाल, तर चालकाचे अपहरण केल्याप्रकरणात सुरेंद्र अगरवाल अशांना अटक झाली होती. सध्या मकानदार आणि गायकवाड आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस करत असलेल्या तपासात मकानदार याची भूमिका ही पहिल्यापासूनच संशयास्पद आहे. तो अवैध धंद्याशी निगडित असून, हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या बरोबरच तो अवैध पंद्यावरून पोलिसांसाठी पैसेही गोळा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मकानदार याचा अपघात प्रकरणातदेखील महत्वाचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तश्वरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतृत्व झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ज्या दिवशी रक्ताची डीएनए तपासणी होण्यासंबंधी बातमी पसरली व विशाल अगरवाल अगवालवर अटकेची टांगती तलवार पाह‌ता मकानदार आणि त्यांच्यातील डील लांबणीवर पडली. दरम्यानण्या काळात विशाल अगरवाल आणि मकानदारवी एका कॅफेत भेटही झाली. पाच बैठकीत मकानदारने विशालला तुझ्यावर कारवाई होईल, असे सांगितले. त्यानंतरच विशाल अगरवाल संभाजीनगर येथे फरार झाला होता. अगरवालने डॉ. वावरे यांना कोणामार्फत पैसे दिले, याचा शोध गुन्हे शाखेकडून वेण्यात येत ोता. तपासात अगरवालने अल्फाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरे याला पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पसार झालेल्या अश्फाक आणि अमर बांना गुन्चे शाखेच्या पथकाने अटक केली.