भरधाव कारने दोघांना चिरडले; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: रहाटगाव येथे नागपूर – अकोला महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभ्या असलेल्या आई आणि मुलाला भरधाव कारने चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.6) घडली. नागपूर ते अकोला नॅशनल हायवे नजीकच्या रहाटगाव बायपासवर हा अपघात झाला. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मुलावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मेश्राम (वय.25) हा आपली आई सुनंदा मेश्राम (वय.45) दोघेही राहणार सावर्डी हे दुचाकीवरुन जात होते. दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसापासून बचावासाठी ते एका झाडाखाली उभे होते. तेवढ्यात रहाटगाव मार्गे आलेल्या लाल रंगाच्या भरधाव कार क्रमांक (एमएच 14 एचके 0265) ने दोघांना चिरडले. या अपघातात सुनंदा यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम गंभीर आहे. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
भाजप संघात झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना
खूषखबर! आला रे आला…मान्सून महाराष्ट्रात आला…
Shobha Bachhav | गळ्यात कांद्याची माळ घालून माहेरी शोभा बच्छाव यांचे जंगी स्वागत