संभाजीनगरमध्ये विधानसभेला शिरसाटांना खैरेंचे आव्हान ?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला. यामध्ये पराभूत झालेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय …

संभाजीनगरमध्ये विधानसभेला शिरसाटांना खैरेंचे आव्हान ?

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला. यामध्ये पराभूत झालेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांच्यापुढे खैरे यांचे आव्हान उभे राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. 2009 साली हा मतदारसंघ मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाला. तेव्हापासून शिवसेनेचे संजय शिरसाट हे या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. आता शिवसेनेतील फुटीनंतर शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
आता लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. खैरे हे मागासवर्गीय प्रवर्गात मोडतात. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात शिरसाटांच्या विरोधात उतरविले जाऊ शकते. खैरे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने येत्या काळात त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यावर पक्षाचा भर राहील. सध्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेकडे शिरसाटांना टक्कर देईल असा नेता दिसत नाही. त्यामुळे पक्षासाठी खैरे हा पर्याय पसंतीचा पर्याय ठरु शकतो, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा :

Beed News : नाखलगावात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू ; तर चिमुकलीला विजेचा चटका
Lok Sabha : देशातील २८० नवनिर्वाचित खासदार पहिल्यांदाच लोकसभेत
Stock Market Closing Bell : ‘तेजी’चे वारे कायम, आज शेअर बाजारात काय घडलं?