परभणी : माजलगाव-नांदेड मार्गावरील अपघातात वडील-मुलाचा मृत्यू

ताडकळस (परभणी) : येथील पुर्णा रस्त्यावर गुरुवार ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास दोन पिक अपचा अपघात झाला. जिंतूर तालुक्यातील कोक येथील वडील-मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेत पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगाजीबापू येथे जावळ काढण्यासाठी एम .एच.०४ एच. डी‌. ९१६३ या वाहनाने जात असलेले कोक, शेक, साडेगाव येथील १० ते १२ नातेवाईक जखमी झाले. …

परभणी : माजलगाव-नांदेड मार्गावरील अपघातात वडील-मुलाचा मृत्यू

ताडकळस (परभणी) : येथील पुर्णा रस्त्यावर गुरुवार ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास दोन पिक अपचा अपघात झाला. जिंतूर तालुक्यातील कोक येथील वडील-मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेत पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगाजीबापू येथे जावळ काढण्यासाठी एम .एच.०४ एच. डी‌. ९१६३ या वाहनाने जात असलेले कोक, शेक, साडेगाव येथील १० ते १२ नातेवाईक जखमी झाले. त्यांना परभणी, नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
अधिक वाचा-  

कुरुंदवाड : हेरवाड येथे भरधाव कारने दुचाकीला उडवले, सर्व प्रवासी सुखरूप

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील शेक येथील नृसिंह जिजाभाऊ गलांडे यांच्या सोहम या लहान मुलाचे जावळ काढण्यासाठी श्री. क्षेत्र गंगाजीबापु येथे धार्मिक विधीसाठी एम बुलोरा पिक अपने जात होते. गुरुवार ६ जुन रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ताडकळस येथुन २ किमी अंतरावर माजलगाव ते नांदेड राज्य महामार्गावर रस्त्यावर लघुसंघेसाठी बुलोरा पिक अप मधील सर्वजण खाली उतरले होते. याच दरम्यान ताडकळसकडून नांदेडकडे भाजीपाला घेऊन जाणारा एम .एच.२० जी.सी ०९३४या पिक अपने जोराची धडक दिली.
अधिक वाचा-  

Mumbai Monsoon | मान्सून मुंबईत दाखल होण्यास पोषक वातावरण

या धडकेमुळे प्रसाद बापुराव गारुडी (वय ४५ वर्षे रा. कोक) हे जागीच ठार झाले तर या घटनेत सुनील प्रसाद गारुडी (वय १६ वर्षे) हा गंभीर जखमी झाल्याने नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. हे दोघे वडील-मुलगा होते. शेक, कोक, साडेगाव येथील १० ते १२ नातेवाईक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना परभणी, नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
अधिक वाचा-  

बीड : पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षेपार्ह पोस्ट, परळीतील युवकाला अटक