बीड : प्रियसीसोबतचे भांडण भोवले; प्रियकराची विष पाजून हत्या

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून जीवानिशी जाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अगोदर प्रियसीसोबत भांडण झाले. त्यात प्रेमसंबंध ताणले गेले. त्यानंतर धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर या प्रियकराला बोलावून गुरूवारी (दि.६) मारहाण केली व त्यानंतर विष पाजून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खूनाचा …

बीड : प्रियसीसोबतचे भांडण भोवले; प्रियकराची विष पाजून हत्या

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा : एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून जीवानिशी जाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अगोदर प्रियसीसोबत भांडण झाले. त्यात प्रेमसंबंध ताणले गेले. त्यानंतर धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर या प्रियकराला बोलावून गुरूवारी (दि.६) मारहाण केली व त्यानंतर विष पाजून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती भरत चौधरी (वय ३२, रा कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी) असे मृत प्रियकराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मारुती चौधरी याचे आपल्या प्रियसीबरोबर काही कारणांवरून भांडण झाले. याचा राग मनात धरून प्रियसीने मारुती याला आज धर्मापुरी फाट्यावर एका अखाड्यावर बोलावून घेतले. व त्यानंतर सात जणांच्या मदतीने त्याला मारहाण करत त्याला विष पाजले. त्यानंतर अत्यावस्थ अवस्थेत त्याला काही नागरिकांनी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शेषराव भरत चौधरी (वय २७ वर्षे रा. कारबेटवाडी जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत मनोहर देवकते, प्रियंका प्रभाकर चौधरी, सोनेराव मनोहर देवकते, रेखा मनोहर देवकते, मनोहर सोनेराव देवकते, कृष्णा श्रीरामे, नाईकवाडे (पुर्ण नाव माहीत नाही), गौरव (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बुक्तरवाडी ता. सोनपेठ जि. परभणी या आठ आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कवडे हे करत आहेत.
हेही वाचा :

नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २५ वर्षे सश्रम कारावास
बीड : पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षेपार्ह पोस्ट, परळीतील युवकाला अटक
परभणी : माजलगाव – नांदेड राज्य महामार्गावर अपघात, वडील-मुलाचा मृत्यू