१९८४ च्या निकालाची मराठवाड्यात पुनरावृत्ती
उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : 1984 च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. अपवाद होता, तो फक्त छत्रपती संभाजीनगरचा. संभाजीनगरातून एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर विजयी झाले होते. या निकालाची आठवण देणारी पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत झाली. यंदाही संभाजीनगर वगळता अन्य सात मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असताना संभाजीनगरकांनी मात्र वेगळा कौल देत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी केले. loksabha election 2024
84 आणि आताच्या निवडणुकीत काही फरक असला तर सहानुभुती हा थोड्याफार प्रमाणात कॉमन फॅक्टर आहे. इंदिरा गांधी यां च्या हत्येनंतर झालेल्या 84 च्या निवडणुकीत नांदेडमधून शंकरराव चव्हाण, बीड येथे केशरकाकू क्षीरसागर, लातुरात शिवराज पाटील चाकूरकर, हिंगोलीत उतमराव राठोड,जालन्यातून बाळासोहब पवार,धाराशिवला अरविंद कांबळे यांनी बाजी मारली होती. महाराष्ट्रातून तेव्हा एस काँग्रेसचे शरद पवार आणि साहेबराव डोणगावकर हे दोघेचे विजयी झाले होते. डोणगावकर यां च्या विरोधात काँग्रेसने अब्दुल अजीम यांना उमेदवारी दिली होती. अजीम नको या भावनेतूनच संभाजीनगरचा हिंदू मतदार तेव्हा एकवटला होता, त्यांनी डोणगावकरांना निवडून दिले अशी कारणमीमांसा केली जाते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सात जिल्ह्यात महाविकास आघाडीला भरभरून मते मिळाली. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे या दि ग्गजांनाही त्यांचा फटका बसला.शिवसेना, राष्ट्रवादी फोडल्याचा राग व त्यातून निर्माण झालेली सहानुभुती हे या सातही उमेदवारांच्या विजयामागील एक कारण होते. त्यामुळेच वसंतराव चव्हाण हे नांदेडमधून, परभणीत बंडू जाधव, हिंगोलीत नागेश पाटील, धाराशिवला ओमराजे निंबाळकर, लातूरमधून डॉ. शिवाजीराव काळगे हे विजयी झाले. जालन्यातून डॉ. कल्याण काळे आणि बीड म ध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. असे असताना संभाजीनगरातून मात्र शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी बाजी मारली. त्याची विविध कारणे असली तरी मावळते खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील नको या भावनेतून भुमरे यांना मतदान करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रयत्न केले. भुमरे यांच्या विजयात हिंदुत्ववादी मतदार हा प्रमुख घटक आहे, हे मान्यच करावे लागते.
1984 नंतर मोरेश्वर सावे दोन वेळा, एकदा प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे चार वेळा खासदार झाले. मागील निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले. 1998 ला मात्र रामकृ ष्णबाबा पाटील लोकसभेत पोहचले होते. त्यामुळे मागील 25 वर्षांचा विचार करता रामकृ ष्णबाबा सोडले त जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी, मुस्लिम समाजाकडे राहिले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला आणि भुमरे यांना समाजाने मतदान केल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार