आनंदवार्ता! नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदा मान्सूनचा वेग हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे राेजी दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ८ जूनला दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु यापूर्वीच दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला (Monsoon Update)  आहे, अशी अपडेट पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी X पोस्टवरून …

आनंदवार्ता! नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: यंदा मान्सूनचा वेग हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे राेजी दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ८ जूनला दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु यापूर्वीच दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला (Monsoon Update)  आहे, अशी अपडेट पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी X पोस्टवरून दिली आहे.
होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नैऋत्य मोसमी पावसाचे आज ( दि. ६ जून)  महाराष्ट्रात आगमन झाले. तळकोकणातील रत्नागिरीमध्ये मान्सून सध्या दाखल झाला आहे.. त्यानंतर मेडक. भद्राचल, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे.”
पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने गोव्यापर्यंत मुसंडी मारली आहे, परंतु गेल्या दोन दिवसांपासून मान्सून गोव्यातच थांबलेला होता. मात्र, येत्या २४ ते ४८ तासांत म्हणजे शनिवार ८ जूनपर्यंत मान्सून कोकणासह मुंबई, पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र तत्पूर्वी २ दोन दिवस आधीच गुरूवार ६ जून रोजी मान्सून तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाला असल्याची, माहिती हवामान विभागाने दिली आहे.

शुभ वार्ता।
नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज ६ जून रोजी #महाराष्ट्रात आगमन झाले. ते #कोकणातील #रत्नागिरी, #सोलापूर आणि पुढे #मेडक, #भद्राचलम #विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून #इस्लामपूरपर्यंत पोहोचले.
IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024

मान्सून दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला असून त्याने जोरदार हजेरी लावलेली आहे. लगेच मान्सून कोकणापर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सूनचा मुक्काम गोव्यातच थांबला आहे. त्यामुळे मान्सूनचा कोकण प्रवेश अद्याप रखडला होता. मात्र मान्सून महाराष्ट्र आगमनाने राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
‘रेमल’मुळे मान्सूनचा वेग वाढला
IMD ने यापूर्वी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु चक्रीवादळ रेमलमुळे, मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.