Pune Drugs Case : आ. रवींद्र धंगेकर यांचे पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमलीपदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. कैद्यांची बडदास्त ठेवणारे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार, पोलिस प्रशासनाविरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे सांगत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्तालय समोर बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप हाती घेण्यात आली नाही. सरकारने या प्रकरणाकडे अधिक गंभीरतेने पाहावे, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास द्यावा. या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना अद्याप अटक केली नाही. पैशांची देवाणघेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते याला आम्ही आंदोलन इशारा दिल्यावर अटक झाली.
तसेच कारागृह प्रशासनाची कसून चौकशी झाली नाही. एकूणच या प्रकरणी सर्व दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.
ललित पाटील प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत नाहीत. त्यांनी लक्ष घातले असते, पोलिसांनी वेळेवर तपास केला असता, तर आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटील हा लपूनछपून नव्हे, तर उघडउघड ससूनमधून ड्रग्जचा धंदा करीत होता. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये पोलिसांना, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना दिले आहेत. म्हणूनच कठोर कारवाई होताना दिसत नाही.
न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन
ससूनपासून हाकेच्या अंतरावर बंडगार्डन पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालय आहे. ससूनमधून ललित पाटील डग्ज विक्री करत होता. ललित लाखो रुपये पोलिस आणि डॉक्टरांना वाटत होता. न्याय मिळत नाही तोपर्यंत रोज ठिय्या आंदोलन करत राहणार. याबाबत विधानसभेतही आवाज उठविणार, असेही धंगेकर म्हणाले. ठाकूर यांच्या पदमुक्ततेची कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाली आहे. शासनाने या प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई केली नाही.
हेही वाचा
Pune Drugs News : सुदाम इंगळेला अभिषेक बलकवडेकडुन पैसे
Pune : आळेफाटा उपबाजारात कांदा दरात वाढ
Pune : आळेफाटा उपबाजारात कांदा दरात वाढ
The post Pune Drugs Case : आ. रवींद्र धंगेकर यांचे पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमलीपदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. कैद्यांची बडदास्त ठेवणारे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार, पोलिस प्रशासनाविरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे सांगत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिस …
The post Pune Drugs Case : आ. रवींद्र धंगेकर यांचे पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या appeared first on पुढारी.