Pune : खंडकर्यांना न्याय देण्यात आ. भरणे यांना यश
वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये घेण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेती महामंडळाचे राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये एकूण 14 मळे आहेत. काही वर्षांपूर्वी महामंडळाने शेती पिकवणे बंद केल्याने खंडाने असलेल्या जमिनी मूळ मालकाला अथवा त्यांच्या वारसाला परत करण्यात आल्या होत्या. या जमिनी परत करताना त्यावर भोगवटा वर्ग 2 चा शेरा टाकण्यात आला होता.
हा शेरा वाटपानंतर 10 वर्षांनंतर आपोआप कमी होऊन जमिनी भोगवटा वर्ग 1 मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, जमिनी वाटप होऊन जवळपास 15 वर्षे झाली तरीही जमिनींवरील वर्ग 2 शेरा कमी झाला नाही. परिणामी, शेतकर्यांना जमिनी परत मिळूनही त्या जमिनींवर पीक कर्ज, विहीर पाइपलाइन कर्ज व अन्य शेतीशी निगडित कर्ज घेता येत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळ्यातील खंडकरी शेतकर्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली होती. आ. भरणे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला. पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली, त्या वेळी सभागृहात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जमिनींचे भोगवटा नंबर 1 मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले होते. 3 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तद्नंतर या प्रश्नावर आमदार भरणे यांनी महसूल विभाग, विधी व न्याय विभाग या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याबाबत प्रस्ताव सादर केला.
बुधवारी (दि. 29) मंत्रिमंडळ बैठकीत शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकर्यांना भोगवटा वर्ग 1 जमिनीसाठी अधिनियमता सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी महसूल विभागास निर्देश देण्यात आले आहेत. येणार्या हिवाळी अधिवेशनात अधिनियमात दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे राज्यातील खंडकरी शेतकर्यांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने आमदार भरणे यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
The post Pune : खंडकर्यांना न्याय देण्यात आ. भरणे यांना यश appeared first on पुढारी.
वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये घेण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेती महामंडळाचे राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये एकूण 14 मळे आहेत. काही वर्षांपूर्वी …
The post Pune : खंडकर्यांना न्याय देण्यात आ. भरणे यांना यश appeared first on पुढारी.