फडणवीसांनी दळभद्री, सूडाचं राजकारण केले; खासदार संजय राऊत
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: देवेंद्र फडणवीसांवर उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची मोठी जबाबदार होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी सूडाचे आणि दळभद्री राजकारण केले. फडणवीस या वृत्तीनं राजकीय संस्कृतीचा नाश केला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत राज्याच्या जनतेने फडणवीसांचा बदला घेतला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (दि.६ जून) बोलत होते.
फडणवीसांनी पेशवेकालीन आनंदीबाईं सारखे राजकारण केलं. लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असे देखील खासदार राऊत यांनी म्हटले आहे.