भविष्यात राहुल गांधी पंतप्रधान होतील? ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहे. भाजप प्रणित एनडीएन आघाडीने निर्णायक बहुमत मिळवले. तर भाजपविरोधी इंडिया आघाडीनेही जोरदार मुसंडी मारली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार कमबॅक केले. यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. काँग्रेस सलग तिसर्यांदा सत्तेपासून लांब राहिली असली राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता या निवडणुकीत सिद्ध केली आहे. आता राहुल गांधी हे भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील? अशा चर्चेलाही उधाण आले आहे. जाणून घेवूया राहुल गांधी यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी केलेले भाष्य….
राहुल गांधींसाठी ग्रहमान अनुकूल
ज्योतिषी चिराग दारूवाला सांगतात, राहुल गांधी यांचा रास तूळ आहे. या राशीच्या जातकांना २० मे २०२४ ते २७ मार्च २०२७ या कालावधीत असाधारणपणे अनुकूल शनि अंतरदशा आहे. या शुभ शनि कालावधीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. आगामी काळात त्यांची लोकप्रियता वाढण्याची शक्यता असून, राजकारणातही त्यांची पत आणखी वाढणार आहे. या काळात राहुल गांधी हे काँग्रेस पक्षात आपले नेतृत्व मजबूत करतील. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची शक्ती म्हणून उदयास येताना दिसतील.
राहुल गांधींचे भारतीय राजकारणातील स्थान हाेणार अधिक मजबूत
राहुल गांधी यांच्यासाठी सध्याचा काळ हा त्यांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी अनुकूल आहे. भाजपला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. या पक्षाला सत्तेवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी मित्रपक्षांचा पाठिंबा आणि धोरणात्मक डावपेच आखवे लागतील. राहुल गांधी यांच्यासाठी असणार्या अनुकूल ग्रहस्थितीचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल. भारतीय राजकारणात भविष्यात ते आपले स्थान अधिक मजबूत करण्यास सज्ज असतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष मोठे यश संपादन करु शकतो.
हेही वाचा :
Lok Sabha 2024 : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? पहा ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Lok Sabha Election 2024 Result : इंडिया आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार नाही : मल्लिकार्जुन खर्गे