Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बर्ड फ्लूच्या H5N2 प्रकाराच्या संसर्गामुळे जगातील पहिला बळी मेक्सिकोमध्ये गेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने बुधवारी (दि.६) सांगितले की, मेक्सिकोमधील एका व्यक्तीचा H5N2 नावाच्या बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, जो मानवांमध्ये यापूर्वी कधीही आढळला नव्हता.
व्यक्तीला संसर्ग कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेक्सिकोमधील पोल्ट्रीमध्ये H5N2 ची नोंद झाल्याचे मात्र डब्ल्यूएचओने सांगितले. मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी २३ मे रोजी UN आरोग्य संस्थेला संबंधित रूग्णाला H5N2 विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ५९ वर्षीय त्या रूग्णाला मेक्सिको सिटीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात आल्याचा कोणताही अहवाल नाही. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ताप, अतिसार आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये फ्लूचा अज्ञात प्रकार दिसून आला, ज्याची प्रयोगशाळेच्या चाचणीनंतर H5N2 म्हणून पुष्टी झाली. जागतिक स्तरावर नोंदवलेले इन्फ्लूएंझा H5N2 विषाणूच्या संसर्गाची ही पहिली पुष्टी केलेली मानवी केस असल्याचे WHO ने म्हटले आहे.
बर्ड फ्लूचा आणखी एक प्रकार H5N1 युनायटेड स्टेट्समधील दुग्धशाळेतील गायींमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून पसरत आहे. यातील काही प्रकरणे मानवांमध्ये नोंदवली गेली आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की यापैकी कोणतीही प्रकरणे मानव-ते-मानवी असा संसर्ग होत नसून, हा रोग गुरांपासून माणसांमध्ये पसरतो.
हेही वाचा :
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ क्लॉडिया शीनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
इस्रायलने युद्ध थांबवल्यास हमास करार करण्यास तयार