फडणवीसांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये भूकंप
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीसांनी आज (दि.५) दुपारी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्याने भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी भाजप महिला मोर्चा आणि कार्यकर्ते सागर बंगल्याबाहेर जमा होऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले होते फडणवीस
राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल, असे त्यांनी आज (दि.५ ) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
आम्ही फक्त अर्धा टक्क्याने मागे राहिलाे
या वेळी फडणवीस म्हणाले की, लाेकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा एकट्या भाजपने जास्त मिळवल्या आहेत. भाजप आणि इतर पक्ष मिळून सरकार तयार होत आहे. लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 43 टक्के मते मिळाली. तर, आम्ही फक्त अर्धा टक्क्याने मागे राहिलो. यामध्ये महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. मुंबईमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या.
2019 आणि 2024 च्या निवडणूकीतील मतांचे वर्गीकरण करताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला 27.84 टक्के मते मिळाली होती. तर, यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपला 26.17 टक्के इतकी मते मिळाली. तर, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला 16.41 17 टक्के मिळाली होती. यामध्ये त्यांच्या 13 जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चुरशीने निवडणूका झाल्या यामध्ये आमच्या 8 जागा 4 टक्के मताने पडल्या.