कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये २८ गावांत राजरोसपणे मटका सुरु; पोलिसांचे दुर्लक्ष

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 28 गावात तीन पानी जुगार लीडवर आहे. तर दारू मटका व्यवसायांनी आपले बस्तान बसवले आहे. जोडीला गांजा आणि हातभट्टी दारू रुजली आहे. हे अवैध व्यवसाय ओपन असून कारवाई मात्र क्लोज आहे. पोलीस प्रशासन मटका-बुकी आणि मुख्य  मालक सोडून गल्ली बोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फार्स सातत्याने करीत …

कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये २८ गावांत राजरोसपणे मटका सुरु; पोलिसांचे दुर्लक्ष

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 28 गावात तीन पानी जुगार लीडवर आहे. तर दारू मटका व्यवसायांनी आपले बस्तान बसवले आहे. जोडीला गांजा आणि हातभट्टी दारू रुजली आहे. हे अवैध व्यवसाय ओपन असून कारवाई मात्र क्लोज आहे. पोलीस प्रशासन मटका-बुकी आणि मुख्य  मालक सोडून गल्ली बोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फार्स सातत्याने करीत आहेत.
गेल्या दहा महिन्यांत अनेक अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. अनेक एजंटाना अटक व सुटका झाली. यामध्ये पंटरांनाच मटका बुक्की दाखवण्यात आले. आजपर्यंतच्या कारवाईत एकाही मुख्य बुकीवर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. मटका आणि तीन पानी अवैध व्यवसायाचा मुख्य कोण ही पुढची साखळी शोधलीच जात नाही. पोलीस अवैध व्यवसायांना चाप लावल्याचा फक्त दावा करतात.
मटक्‍याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. कारवाई झालीच तर दोन दिवसांनी ‘दर’ वाढवून पुन्हा व्यवसाय सुरू होतो. व्हॉटस्‌ ॲप, गुगल-पेवर आकड्याचा मॅसेज टाकून पैसे सोडून ऑनलाईनच्या माध्यमातून मटका घेतला जातो.चिठ्ठीवरचा ही मटका सुरूच आहे.गणेशवाडी ते शिवणाकवाडी,शिरदवाड ते खिद्रापूर पर्यंत 28 गावात एजंटांनी पाय पसरले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पहिल्याच दिवशी मटका, जुगारासह अवैध धंद्यांवर चाप लावू, असा इशारा देत कारवाईचा धडाका लावला होता.त्यानंतर पोलीस ठाण्याना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात‘ तीन पाणी,मटका जुगार बंद’ असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसत आहे.
दारू-मटक्याचे मानधन झिरो पोलिसांकडून कलेक्शन?
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिकांकडून मासिक मानधन गोळा करणारे कलेक्टर सोशल मीडियामुळे आपले सावज होऊ नये. म्हणून माध्यमात काम करणाऱ्या एकाची तर घोसरवाड येथील एका दारू विकणाऱ्या अड्डा चालकाला झिरो पोलीसाचा दर्जा देऊन त्यांच्या माध्यमातून मान-धन कलेक्शन केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे.