विदर्भात महायुतीला धक्का; काँग्रेसला हात   

[author title=”राजेंद्र उट्टलवार   ” image=”http://”][/author]  नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला जोरदार धक्का बसला असून दहापैकी 7 जागा महायुतीने गमावल्या. गेल्यावेळी राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी 5 जागी विजय देत विदर्भाने मोठा हात दिला आहे. गेल्यावेळी आठ जागा जिंकणाऱ्या महायुतीला नागपूर,बुलडाणा आणि अकोला या तीनच जागांवर समाधान मानावे लागले …

विदर्भात महायुतीला धक्का; काँग्रेसला हात   

[author title=”राजेंद्र उट्टलवार   ” image=”http://”][/author]

 नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : विदर्भात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला जोरदार धक्का बसला असून दहापैकी 7 जागा महायुतीने गमावल्या. गेल्यावेळी राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी 5 जागी विजय देत विदर्भाने मोठा हात दिला आहे.

गेल्यावेळी आठ जागा जिंकणाऱ्या महायुतीला नागपूर,बुलडाणा आणि अकोला या तीनच जागांवर समाधान मानावे लागले असून शिवसेना शिंदे गटाला रामटेक, यवतमाळमध्ये पराभव तर बुलढाण्यात विजय मिळाला आहे. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला वर्धा लोकसभा मतदारसंघात विजय मिळाल्याने विदर्भात प्रथमच तुतारी वाजली आहे. नागपुरात भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा 1 लाख 37 हजार मतांनी पराभव केला असून हा सलग त्यांचा तिसरा विजय आहे. गडकरी यांना 655027 मते मिळाली तर विकास ठाकरे यांना 517424 मते मिळाली. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला होता तर बसपाचे योगेश लांजेवार यांची उमेदवारी 192402 मतांसह कमकुवत ठरल्याचे निकालाने स्पष्ट केले.

रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्यावर 80 हजारांची निर्णायक आघाडी घेतली असून माजी मंत्री सुनील केदार यांचा हा मोठा विजय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठा पराभव म्हणता येईल .शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून भाजपच्या आग्रहाखातर काँग्रेसच्या आमदाराला शिवसेनेने शिवधनुष्य हाती दिली होते. यापाठोपाठ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीने भाजपसाठी प्रतिष्ठेच्या चंद्रपूर मतदारसंघात सुमारे 2 लाख 60 हजार मताधिक्याने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला.

पहिल्या फेरीपासून धानोरकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. राज्यात हा सर्वात मोठा विजय असू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात झाली मात्र या सभेतील वादग्रस्त वक्तव्याने मुनगंटीवार यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते. प्रतिभा धानोरकर यांनी 7 लाख 16 हजार 635 मते मिळविली.  भाजपाचे  सुधीर मुनगंटीवार  4 लाख 56 हजार 943 मते  घेतली. वंचितचे राजेश बेले यांना 21 हजार 897 मते पडली.गेल्यावेळी मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर विजयी झाले होते. यावेळी प्रतिभा धानोरकर यांना मतदारांनी विधानसभेतून संसदेत पाठविले आहे.

 विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे पक्षातील वजन वाढले आहे. गडचिरोली न जिंकल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली होती.  गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांनी १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी पराभव केला. नामदेव किरसान यांना ६ लाख १७ हजार ७९२, तर निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे  अशोक नेते यांना ४ लाख ७६ हजार ६९६ मते मिळाली. बसपाचे प्रा.योगेश गोन्नाडे हे १९ हजार ५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘नोटा’ ला १६ हजार ७१४ मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे १५ हजार ९२२ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर राहिले.

दरम्यान, अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी विद्यमान खासदार व महायुतीत प्रचंड नाराजी असताना भाजपने उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांचा १९ हजार ७३१ मतांनी मोठा पराभव केला. भाजपकडून पुनर्मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला. मविआ, काँग्रेस उमेदवार वानखडे यांना ५ लाख २६ हजार २७२ तर प्रतिस्पर्धी नवनीत राणा यांना ५ लाख ६५ हजार ४० मते मिळाली. महायुतीशी फारकत घेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहारच्या माध्यमातून पुढे केलेल्या दिनेश बुब यांच्या उमेदवारीचा राणा यांना अमरावतीत चांगलाच फटका बसला. बुब यांनी  ८५ हजार ३०० मते घेतली. वंचित समर्थित रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी  १८ हजार ७९३ मते घेतली. एकूण ३७ उमेदवार अमरावती लोकसभेच्या मैदानात होते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी अपेक्षेनुसार पहिल्या फेरीपासून आघाडी घेत शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यावर 1 लाख मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला.

विद्यमान शिवसेना खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेली होती गवळी, संजय राठोड येथून उत्सुक होते या नाराजीचाही फटका त्यांना बसल्याचे निकालाने सिद्ध केले. 29 व्या फेरीपर्यंत  संजय देशमुख यांना ५ लाख ८८ हजार ६१९ तर राजश्री पाटील यांना ४ लाख ९६ हजार २३८ मते मिळाली. वर्धा लोकसभा मदारसंघाची लोकसभेची निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तुतारी दिल्याने सुरूवातीपासून उत्सूकतापूर्ण ठरली. अमर काळे यांनी भाजपनेते रामदास तडस यांची हॅट्ट्रिक रोखल्याने ते विधानसभेत नव्हे तर लोकसभेत पोहचले आहेत. अमर काळे यांना 68 हजारांवर मिळालेले मताधिक्य कायम राहिले. एकंदर  २४ उमेदवार रिंगणात होते. १६ लाख ८२ हजार ७७१ मतदारांपैकी १० लाख ९१ हजार ३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 भाजप राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 30 वर्षांनंतर  ताबा मिळविला आहे. अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तिसऱ्यांदा संसदेत जाण्यास इच्छुक भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा सुमारे ३० हजार मतांनी पराभव केला. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. बसपाचे संजय कुंभलकर, वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते.  सुरुवातीपासूनच  सुनील मेंढे आणि डॉ. प्रशांत पडोळे यांच्यामध्येच अटीतटीची लढत दिसून आली. या निकालाने प्रफुल्ल पटेल यांना धक्का तर नाना पटोलेंचा वरचष्मा कायम राहिला.पटोले हेच निवडणूक लढणार, हे जवळजवळ स्पष्ट होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी नकार देत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसने डमी उमेदवार दिल्याचा आरोप  विरोधकांनी केला मात्र निकालने तो खोटा ठरविला. विदर्भात या निवडणुकीत बसपा, वंचितचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

भाजपासाठी महत्त्वाच्या अकोला मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी आघाडी घेतलेली असताना अखेरच्या टप्प्यात भाजपचे उमेदवार अनूप संजय धोत्रे त्यांनी विजय मिळवत हा परंपरागत मतदार संघ कायम ठेवला. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे ते सुपुत्र आहेत. भाजप उमेदवार अनूप धोत्रे यांना 4 लाख ५७ हजार ३० तर काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना ४ लाख १६ हजार ४०४ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना २ लाख ७६ हजार ७४७ मते मिळाली. बुलडाणा मतदारसंघात शिवसेना विद्यमान प्रतापराव जाधव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा 29 हजार 479 मतांनी पराभव केला. जाधव यांना तीन लाख 49 हजार 867 खेडेकर यांना तीन लाख वीस हजार 388 मते पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना दोन लाख 49 हजार 963 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांना 98 हजार 441 मते पडली. विदर्भात अकोला अमरावती तिरंगी तर ही चौरंगी लढत होती.

हेही वाचा :

Lok sabha Election 2024 Results : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक
Lok sabha Election 2024 Result : शेवटी चमत्कार घडलाच; अनिल देशमुख यांची लोकसभा निकालावर प्रतिक्रिया
Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा