Lok Sabha Election 2024 Results| विकासाच्या राजकारणाला जनादेश : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देशातील जनतेने विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा जनादेश दिला. महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला कौल आम्ही अत्यंत विनम्रपणे मान्य करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.५) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर  दिली. आपला पक्ष देशासह राज्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करत राहील. आम्ही राष्ट्रविकासासाठी कटीबद्ध आहोत. मी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करतो. त्यांचे अविश्रांत …

Lok Sabha Election 2024 Results| विकासाच्या राजकारणाला जनादेश : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील जनतेने विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा जनादेश दिला. महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला कौल आम्ही अत्यंत विनम्रपणे मान्य करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.५) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर  दिली.
आपला पक्ष देशासह राज्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करत राहील. आम्ही राष्ट्रविकासासाठी कटीबद्ध आहोत. मी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करतो. त्यांचे अविश्रांत कष्ट हेच आमच्या ऊर्जेचा स्रोत आहे. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राज्यभर जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला. देशातील विकास कार्याची माहिती दिली. ते या माध्यमातून लोकांशी जोडले गेले हे कौतुकास्पद आहे. असे म्हणत पुन्हा नव्या जोमाने पक्षाचे काम करू, असा विश्वास बावनकुळे यांनी  माध्यमांसमोर व्यक्त केला.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 Results : सुनील केदार यांनी दाखविले एक हाती वर्चस्व, रामटेकचा गड काँग्रेसच्या ताब्यात
Lok Sabha Election 2024 Results : चंद्रपुरात अडीच लाखाच्या मत्ताधिक्याने प्रतिभा धानोरकर विजयी
Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा