पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: परभणीचे खासदार तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय हरिभाऊ जाधव यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुत्तीचे उमेदवार महादेव जानकर यांना धोबीपछाड केले. त्यांची मताधिक्याने विजयाकडे घौडदौड सुरू आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,बसस्थानक येथे तर ग्रामीण भागात गुलाल उधळत फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
मराठा आरक्षण सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास सत्ताधारी सरकार असमर्थ ठरल्यामुळे त्यांना मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रातील सरकारविरोधात मुस्लिम, दलित समाजाची मते गेल्याचे दिसत आहे. तर या दोन्ही समाजाचे भक्कम पाठबळ महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याने खासदार संजय जाधव १ लाखापेक्षा अधिक मतांची आघाडी घेत विजयी होतील. असे चित्र आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
हेही वाचा
Satara Lok Sabha Result : उदयनराजे विजयी; अटीतटीच्या लढतीत शशिकांत शिंदेंचा पराभव
छत्रपती संभाजीनगरात भुमरेंची विजयाकडे वाटचाल; जलिल, खैरे यांना धोबीपछाड
नांदेडमध्ये अशोक चव्हाण, प्रताप पाटील यांना धूळ चारणारे वसंत चव्हाण आहेत कोण?