मोठी बातमी: नैऋत्य मान्सून गोव्यात पोहचला

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून आज (दि.४ जून) आणखी पुढे सरकला आहे. गुरुवार ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. दरम्यान आज मान्सून महाराष्ट्राच्या जवळ गोव्यामध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने X पोस्टवरून दिली आहे. हवामान विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या …

मोठी बातमी: नैऋत्य मान्सून गोव्यात पोहचला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून आज (दि.४ जून) आणखी पुढे सरकला आहे. गुरुवार ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. दरम्यान आज मान्सून महाराष्ट्राच्या जवळ गोव्यामध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने X पोस्टवरून दिली आहे.
हवामान विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणाचा आणखी काही भाग, रायलसीमाचा उर्वरित भागात आज 4 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.
मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. असेही भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

-> Southwest Monsoon advanced into some more parts of central Arabian Sea, Goa, some more parts of Karnataka & Telangana, remaining parts of Rayalaseema, today the 4th June, 2024. 1/4 pic.twitter.com/9no5MT8ViG
— India Meteorological Department (@Indiametdept) June 4, 2024